Ad will apear here
Next
नैमिषारण्य सुरम्य कथा

नैमिषारण्य सुरम्य कथा या माझ्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यावर काही व्याख्यानेही आयोजित केली गेली. त्याचेही भरपूर कौतुक झाले. 

सगळीकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मी कुठेही जाहिरात केली नाही. विक्रीसाठी प्रयत्न करावे लागलेच नाहीत.  हस्ते परहस्ते आपोआप अनेकांपर्यंत ते पोचले.  व आपोआप मागणी वाढत गेली. अवघ्या दोन महिन्यात पहिली आवृत्ती संपली. मागणी वाढत होती. पावसामुळे बाहेर पडता येत नव्हते. 
काही बदलही करावेसे वाटले व अखेर दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. अनेकांनी भेट देण्यासाठी उत्तम पुस्तक असे सांगून मागणी केली. ज्यांना अशी भेट दिली गेली त्या वाचकांनी माझ्याकडून काही प्रती खरेदी केल्या.

 बेंगलोर बेळगाव मिरज सांगली कोल्हापूर तासगाव जत सातारा शिरवळ मुलुंड ठाणे पवई पेण वाळवा अशा अनेक ठिकाणी पुस्तक पोहोचले आहे. अनेक वाचक फोन करून प्रतिक्रिया कळवतात. काही ठिकाणी पोस्टाने व कुरियरने पुस्तके पाठवा चार्जेस किती कळवा असे फोन आले. त्यांना कुरिअर चार्जेस पावती पाठवली. त्यांनी पुस्तके मिळण्‍यापूर्वीच पैसे माझ्या खात्यात भरले. काही वाचकांनी मी आपण होऊन दिलेली सवलत नाकारून मूळ किंमत पाठवली. घर बसल्या इतकी सुंदर माहिती मिळते आहे शिवाय अत्यंत साधी सोपी सुलभ भाषा असल्यामुळे पुस्तक अत्यंत सुंदर आहे.

 तुम्ही वर्षभर अभ्यास करून खूप परिश्रम घेतले आहेत त्याचा योग्य मोबदला घेतलाच पाहिजे असा आग्रह धरतात. फोन करून भरभरून बोलतात तेव्हा मी अगदी भारावून जाते. माझ्या आई वडिलांची पुण्याई रामतिर्थकर मास्तरांचे आशीर्वाद भाऊ-बहिणी यांचा पाठिंबा नातलगांचे सहकार्य जिवलग मैत्रिणींची साथ, प्रकाशिका भाग्यश्री हिची तत्परता ज्ञानमयी संत पिठाच्या निर्मोही व्यक्तिमत्वांचे सहकार्य डॉक्टर देगलूर कर व अमेरिकेचे डॉक्टर कुलकर्णी यांच्या शुभेच्छा अभ्यासू वाचकांचा उदंड प्रतिसाद व कळत नकळत अनेकांनी दिलेली आभाळमाया यामुळेच माझ्या पुस्तकाला महत्त्व प्राप्त झाले. 

यानिमित्ताने प्रचंड वाचन झाले व माझ्या या पहिल्याच पुस्तकाने मला खूप खूप खूप खूप भरभरून दिले. ही सारी माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा. त्यांच्या च प्रेरणेने या पुस्तकाची निर्मिती झाली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

नैमिषारण्य सुरम्य कथा हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RTGMCY
Similar Posts
चैत्रगौरी ची आवराआवर आमच्या लहानपणी घरोघरी चैत्रगौर महिनाभर माहेरवाशीण म्हणून यायची. तिचे हळदीकुंकू घरोघरी झोकात व्हायचे. त्या वेळी महिलांच्या शब्दकोशात, आळस, दमणूक, अशक्तपणा हे शब्दच नव्हते.
शिवा काशीद सख्यांनो, सध्याच्या कॉम्प्युटर युगात सामान्य माणूस सुद्धा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतो. काहीच अवघड राहिले नाही आता. पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहरे गमवावे लागले.
उगारची चैत्रगौर "आता येईन चैत्र मासी" असे हादग्याच्या गाण्यातून वचन दिल्याप्रमाणे चैत्रगौर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षात तृतीयेला माहेरवाशीण म्हणून सन्मानाने यायची. ती पहिली तीज असायची.
शिस्तप्रिय टिकेकर बाई उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या शिक्षिका लीलाताई टिकेकर आठ मार्च २०२१ या दिवशी नव्वदी पार करून ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख.....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language